ह्या कारणामुळे दोन बड्या व्यावसायिकांना दिवसभर कोर्टात बसून राहण्याची अजब शिक्षा | पाहा हा वीडियो

2021-09-13 0

विनातिकिट प्रवास करणाऱ्यांना किंवा वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दिवसभर कोर्टात बसून राहण्यासारखी सौम्य शिक्षा कोर्ट सुनावतं. पुण्यात मात्र दोन बड्या बांधकाम व्यावसायिकांना दिवसभर कोर्टात बसून राहण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय. शेंडे आणि नहार यांनी बावधन येथे एक गृहप्रकल्प उभारलाय. मात्र, हा गृहप्रकल्प उभारत असताना, त्यांनी पर्यावरण नियमांचं उल्लंघन केलं. त्यावर दोघांच्या विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोर्टात केस केली. कोर्टानं या दोघांना दिवसभर कोर्टात बसून राहण्याची शिक्षा सुनावली. तसंच प्रत्येकी साठ हजारांचा दंडही केलाय. पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात झालेली ही पहिलीच शिक्षा आहे.विशेष म्हणजे, शेंडे आणि नहार या दोघांनीही कोर्टात आपला गुन्हा कबूल केला. आपला हा पहिलाच गुन्हा आहे. त्यामुळं शिक्षा सुनावताना कोर्टानं उदारता दाखवावी अशी याचनाही कोर्टाला केली. त्यामुळं एका दिवसाच्या शिक्षेवर निभावलं. अन्यथा, अशा गुन्ह्यात एक लाख रुपये दंड आणि तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires